गुरुकृपा आखाडा व्दारे उन्हाळी शिबिराचा शुभारंभ

कन्हान,ता.२५ एप्रिल
राम सरोवर टेकाडी (को.ख) येथे गुरुकृपा आखाडा व्दारे उन्हाळी शिवकालीन शस्त्र विद्याकले चे प्रशिक्षण शिबीराचा शुभारंभ करण्यात आला.

गुरुकृपा आखाडा व्दारे रामसरोवर टेकाडी येथे उष्मकालीन शिवकालीन शस्त्र विद्या कला प्रशिक्षण शिबिराची सुरुवात करण्यात आली. भारतीय प्राचिन युध्दकला प्रशिक्षण केंद्र. ज्या युध्द कलेच्या जोरावर छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना केली. महिलांसाठी आत्मविश्वास वाढविणारी व संरक्षणासाठी उपयुक्त असलेली शिवकालीन मर्दानी आखाडा कला शिकण्याची संधी शिबीरातील विद्यार्थ्याना उपलब्ध करण्यात आली आहे.





