शेतात साहित्याची चोरी करून घरफोडी

कन्हान, ता. २६ : नागपूर जबलपूर राष्ट्रीय महामार्गावरील वराडा बसस्थानक जवळील शेतात असलेल्या घरात घरफोडी करून शेत साहित्याची चोरी केली. गहू, डिझेल इंजिन, कॉम्प्रेसर, इलेक्ट्रीक पंप मोटार, ट्रॅक्टरचे क्लज प्लेट, प्रेशर प्लेट, पोकलैंड मशिन टोचन चैन असे ६१ हजार ९४० रुपयांच्या साहित्य चोरून नेले. आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.





