भव्य कलश, कावड यात्रेने दुर्गा माता मंदिर पिपरी ला नवरात्र महोत्सवाची सुरूवात
कन्हान-पिपरी येथे नव दिवस विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन

कन्हान,ता.26 सप्टेंबर
पिपरी या मुळ गावातील जागृत प्रसिद्ध दुर्गा माता मंदिरात नवरात्र महोत्सव “सार्वजनिक दुर्गा माता मंदीर समिती” पिपरी व्दारे पावन कन्हान नदीचे जल १२१ कलशात भरून, नवदुर्गाच्या नवरथा सह भजन, अखाडा, संगीतमय वातावरण व दुर्गा मातेच्या जयघोषात भव्य कलश, कावड यात्रा कन्हान ते पिपरी मंदीरात पोहचुन मातेचे अभिषेक, विधीवत पुजा, अर्चना, घटस्थापना, आरती करून भाविकांनी धार्मिक आंनद घेत सुरूवात करण्यात आली.







