शाहीर राजेंद्र बावनकुळे यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छांच्या वर्षाव
आमदार बावनकुळे व आमदार सावरकर, भावी आमदार चौकसे यांनी दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
कामठी, ता.२७ जानेवारी
महाराष्ट्र राज्यातील सर्व शाहीर कलावंतांना मानधनात वाढ व विविध मागण्या पूर्ण करण्यासाठी हक्कांची लढाई, अन्याय अत्याचार विरोधात लढणारे शाहीर राजेंद्र भीमराव बावनकुळे यांच्या वाढदिवसा निमित्त शुभेच्छांचा वर्षाव महाराष्ट्र भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, आमदार कामठी विधानसभा टेकचंद सावरकर, रामटेक पर्यटक मित्र, भावी आमदार चंद्रपाल चौकसे व तेजस संस्था अध्यक्ष चंद्रशेखर अर्गुल्लेवार, संपादक राजू हिंदुस्तानी, संपादक जब्बार भाई आणि विविध क्षेत्रातील राजकीय, सामाजिक, पत्रकार, कार्यकर्ते यांनी राजेंद्र बावनकुळे यांना निवासस्थानी भेट देऊन शाल श्रीफळ, पुष्पगुच्छ व केक कापून शुभेच्छा दिल्या.

यावेळी प्रामुख्याने शाहीर कलाकार यांनी फोनवर मेसेज स्वरूपात शुभेच्छा दिल्या तर महाराष्ट्र राज्यातील शाहीर कलाकारांनी व सामाजिक, राजकीय, पत्रकार, सांस्कृतिक कलाप्रेमीनी प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष भेटून वाढदिवस साजरा केला.





