Home युथ स्पेशल नरेश बर्वे यांच्या नेतृत्वात – युवक काँग्रेसच्या मशाल मोर्चा ” रोजगार...

नरेश बर्वे यांच्या नेतृत्वात – युवक काँग्रेसच्या मशाल मोर्चा ” रोजगार दो, न्याय दो ” युवक काँग्रेसची मागणी 

9

नरेश बर्वे यांच्या नेतृत्वात – युवक काँग्रेसच्या मशाल मोर्चा

” रोजगार दो, न्याय दो ” युवक काँग्रेसची मागणी 

कन्हान, ता.२७ फेब्रुवारी 

    नागपुर जिल्हा ग्रामीण युवक काँग्रेस व रामटेक विधानसभा युवक काँग्रेस च्या वतीने कन्हान येथे भारतात वाढत्या बेरोजगारी विरोधात ” रोजगार दो, न्याय दो ” या उपक्रमाच्या माध्यमातुन मशाल मोर्चा काढण्यात आला.

    अखिल भारतीय युवक काँग्रेस चे अध्यक्ष श्रीनिवास यांच्या आदेशानुसार जिल्हा काँग्रेस कमेटी उपाध्यक्ष नरेश बर्वे यांच्या नेतृत्वात व माजी जि प अध्यक्षा रश्मी बर्वे यांच्या प्रमुख उपस्थितीत भारतात वाढत्या बेरोजगारी विरोधात

” रोजगार दो, न्याय दो ” या उपक्रमाच्या माध्यमातून कन्हान येथे सायंकाळी तारसा चौक ते आंबेडकर चौक पर्यंत मशाल मोर्चा काढुन केंद्र व राज्य सरकार ला जागविण्याचा प्रयत्न करण्यात आला. यात रोजगार दो, न्याय दो अशी प्रमुख मागणी करण्यात आली.