कन्हान येथून शिर्डी करिता पालखी पदयात्रेचे जल्लोषात प्रस्थान
श्री साईराम पालखी सोहळा समिती व्दारे १४ व्या वर्षी आयोजन
कन्हान, ता. २७ मार्च
श्री साईराम पालखी सोहळा समिती कन्हान जि.नागपुर व्दारे १४ व्या वर्षी बुधवार (दि.२७) साई पालखीचे आयोजन करण्यात आले. ही पालखी सोहळा श्री साई मंदीर इंदिरा नगर, कन्हान येथुन पुजा करून तारसा रोड ते नागपुर जबलपुर राष्ट्रीय महामार्गाने भव्य मिरवणुकी सह पालखी पदयात्रा फुलाच्या वर्षावात व भाविकांच्या जल्लोषात स्वागत करित शिर्डी कडे प्रस्थान करण्यात आली.

पालखी मानाची …… साईंच्या भक्तांची …….
भगवा रंग उधळूनी आकाशी किनार दाटली,
मस्तकी मुकुट चढवूनी मुर्ती बाबांची सजली।
गळ्यात माळ फुलांची, सिंहासन सुभोभिती,
कपाळी शोभे टिळा सोनेरी, अंगावर शुभ्र शाल चढली।
पाहुनी मुर्तीमंत रूप तेजस्वी सूर्य किरणही ढगा आळ ढळली,
पुष्पहारात नाहली मुर्ती, स्थासनी विराजमान झाली ।
जाहला जयघोष साईरामाचा, ढोलताशांची मानवंदना झाली,
डोल लागला निशान भगवा, अन पालखी निघाली शिर्डीला ।

बुधवार (दि.२७) मार्च ला सकाळी ११ वाजता श्री साईराम पालखी सोहळा समिती कन्हान. जि. नागपुर व्दारे १४ व्या वर्षी श्री साई मंदीर इंदिरा नगर, कन्हान येथे पुजा अर्चना करून तारसा रोड मार्गे नागपुर जबलपुर राष्ट्रीय महामार्ग क्र. ४४ ने भव्य मिरवणुक काढण्यात आली.





