Home क्राईम *MCOCA प्रकरणातील फरार आरोपीला उत्तर प्रदेशातून अटक*

*MCOCA प्रकरणातील फरार आरोपीला उत्तर प्रदेशातून अटक*

11

*MCOCA प्रकरणातील फरार आरोपीला उत्तर प्रदेशातून अटक*

चंद्रपूर, दि. 26 मार्च 2026 :
महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा 1999 (MCOCA) अंतर्गत कारवाई करण्यात आलेल्या प्रकरणातील फरार आरोपीस चंद्रपूर पोलिसांनी उत्तर प्रदेश राज्यातून अटक केली आहे.

दिनांक 01/03/2026 रोजी पोलीस स्टेशन वरोरा हद्दीतील बामडाझरी रेती घाटावरील वादातून दोन गटांमध्ये झालेल्या गंभीर संघर्षात रेती व्यवसायिक भारत नागपाल, रा. वर्धा यांची हत्या झाली होती. या घटनेप्रकरणी वरोरा पोलीस स्टेशन येथे अपराध क्रमांक 374/2026 अन्वये भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमानुसार गुन्हा नोंद करण्यात आला होता.

या प्रकरणात एकूण 13 आरोपी निष्पन्न झाले होते. त्यापैकी 12 आरोपींना अटक करून न्यायालयीन कोठडीत रवाना करण्यात आले होते. संबंधित आरोपी हे संघटित स्वरूपात गुन्हे करणारे असल्याचे निष्पन्न झाल्याने सदर गुन्ह्यात महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा 1999 (MCOCA) अंतर्गतही कलमे वाढविण्यात आली. या गुन्ह्याचा पुढील तपास श्री. प्रमोद चौगुले, उपविभागीय पोलीस अधिकारी, चंद्रपूर हे करीत आहेत.

या प्रकरणातील फरार आरोपी जुम्मन मिडवा मिर्झा, वय 24 वर्षे, व्यवसाय – पोकलँड चालक हा गुन्हा घडल्यानंतरपासून फरार होता. सदर आरोपीस पकडण्यासाठी पोलीस अधीक्षक, चंद्रपूर यांच्या आदेशान्वये विशेष पथक स्थापन करण्यात आले होते. तांत्रिक विश्लेषण व गोपनीय माहितीच्या आधारे पोउनि श्री. दीपक कोकडे, पो.हवा./1784 अजय बागेसर, पो.ना./518 गोपीनाथ नरोटे, पो.ना./2761 शेखर माथनकर, चा.पो.ना./1545 वृषभ बारसिंगे, स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूर यांनी आरोपीचा ठावठिकाणा शोधून उत्तर प्रदेश राज्यातील बांदा जिल्ह्यातून त्यास ताब्यात घेतले.

त्यानंतर आरोपीस आज दिनांक 26/03/2026 रोजी वरोरा पोलीस स्टेशन येथे आणून नोंद गुन्ह्यात अटक करण्यात आली. आरोपीस मा. विशेष मकोका न्यायालय, वरोरा यांच्यासमक्ष हजर केले असता, न्यायालयाने त्यास दि. 31/03/2026 पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

ही कारवाई श्री. मुमक्का सुदर्शन, पोलीस अधीक्षक, चंद्रपूर व श्री. ईश्वर कातकडे, अपर पोलीस अधीक्षक, चंद्रपूर यांच्या मार्गदर्शनाखाली, श्री. प्रमोद चौगुले, उपविभागीय पोलीस अधिकारी, चंद्रपूर यांच्या नेतृत्वात करण्यात आली. या पथकात पोउनि श्री. दत्तात्रय कोलते, पोउनि श्री. मनोज वासाडे, पो.हवा./2578 प्रशांत नागोसे, पो.ना./1303 सूरज शेडमाके तसेच स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूर येथील अधिकारी व अंमलदारांचा सहभाग होता.