७४ प्रजासत्ताक दिनी मानव अधिकार संरक्षण संघटन केले रक्तदान
भव्य रक्तदान शिबिरात ३४ रक्तदात्यांनी केले रक्तदान

कन्हान,ता.२७ जानेवारी
मानव अधिकार संरक्षण संघटन पारशिवनी तालुका अध्यक्ष पंकज रामटेके मित्र परिवार द्वारे ७४ वा प्रजासत्ताक दिना निमित्य तारसा रोड, गहुहिवरा चौक, कन्हान येथे भव्य रक्तदान शिबीर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

कार्यक्रमाचे अध्यक्ष मानव अधिकार संरक्षण संघटन राष्ट्रीय अध्यक्ष मा.अरविंद बांबोर्डे, प्रमुख अतिथि कन्हान-पिपरी नगरपरिषद नगराध्यक्षा सौ.करुणाताई आष्टणकर, नप उपाध्यक्ष मा.योगेंद्र रंगारी प्राथमिक आरोग्य केंन्द्र कन्हान चे वैद्यकीय अधिकारी मा.डॉ शशांक राठोड, यांच्या हस्ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर, नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्या प्रतिमेचे पुष्पहार अर्पण करित पुजन केले. यावेळी ध्वजारोहण व राष्ट्रगीत गायन करुन रक्तदान शिबीर कार्यक्रमांची सुरूवात करण्यात आली. आयुष ब्लड सेंटर अॅन्ड कंपोनंट लैब चे विशाल राऊत, रोशनी नागपुरे, कृती पटले, दुर्गेश सपाटे यांच्या सहकार्या ने एकुण ३४ रक्तदात्यांनी रक्तदान केले.





