Home चंद्रपूर रयत नागरी सहकारी पतसंस्थेत भ्रष्टाचाराचा प्रवेश अध्यक्षांच्या मनमानी कारभाराविरुध्द संचालक, सभासद एकवटले

रयत नागरी सहकारी पतसंस्थेत भ्रष्टाचाराचा प्रवेश अध्यक्षांच्या मनमानी कारभाराविरुध्द संचालक, सभासद एकवटले

14

रयत नागरी सहकारी पतसंस्थेत भ्रष्टाचाराचा प्रवेश
अध्यक्षांच्या मनमानी कारभाराविरुध्द संचालक, सभासद एकवटले
पत्रपरिषदेत दिली माहिती
चंद्रपूर : मूल येथील रयत नागरी सहकारी पतसंस्थेतील कर्मचारी मागील अनेक वर्षापासून अध्यक्षांच्या मनमानी कारभारला वैतागले असून संस्थेचे कामकाज व प्रती कर्मचारी उत्पन्न बघुन नियमानुसार पदभरती करणे आवश्यक आहे परंतु संस्थेला कर्मचा-याची गरज नसतांना व कोणत्याही प्रकारची सहाय्यक निबंधक यांची परवाणगी न घेता तसेच कोणतीही पदभरती जाहिरात न देता संस्थेचे अध्यक्ष आपल्या मनमानी कारभार करुन बेकायदेशिर पदभरती केलेली आहे. त्यामुळे संपूर्ण पदभरतीची सखोली चौकशी होणे अनिवार्य आहे. तसेच २००७ ते २०१७ या कालावधीत १४ संचालक मंडळींना कोणत्याही प्रकारची नोटीस न देता त्यांना मनस्ताप दिला. त्यामुळे त्यांनी संचालकपद सोडले. संस्थेने मागील कालावधीत तिनही शाखेमधे ईमारत खरेदी/बांधकाम व प्लॉट खरेदी केलेली आहे. संस्थेकडे ईमारत निधि उपलब्ध नसतांना संस्थेने सभासदांच्या ठेवीमधून इमारत खरेदी व बांधकाम केलेले आहे. असे अनेक प्रकार अध्यक्षांच्या कार्यकाळात सुरु असून आपला मनमानी कारभार असाच सुरु राहावा यासाठी त्यांनी संस्थेच्या निवडणूकीला बगल दिली असून संचालक मंडळात आपल्या नातेवाईकांना प्राधान्य देण्याचा धडाकाच त्यांनी सुरु केला आहे. त्यांच्या या कारभाराला संचालक व सभासद कंटाळले असून अध्यक्षावर कारवाई करावी अशी मागणी त्यांनी पत्रपरिषदेत केली.
संस्थेचे अध्यक्ष निपचंद शेरकी यांनी आपल्या पदाचा दुरउपयोग करुन संस्थेच्या पैशाने आपल्या पत्नीच्या मालकी असलेल्या इमसरतीला चॅनलगेट लावून दिलेले आहे.वार्षीक आमसभेला सभासदांच्या खोटया स्वाक्ष-या करुन तसेच संचालक सभेला हजर नसतांना त्यांची खोटी स्वाक्षरी मारुन सभेला हजर दाखवणे, वार्षीक आमसभेला सभासद उपस्थित नसतांना संस्थेचे अध्यक्ष यांनी आपली मनमाणी करुन त्यांची खोटी स्वाक्षरी करुन खर्चाची वाढीव बिल काहुन संस्थेची फसवणुक केलेली आहे. तसेच संचालक सभेमधे काही संचालक हजर नसतांना त्यांची प्रोसेडींग बुक वर खोटी स्वाक्षरी मारुन त्यांना हजर दाखविण्यात आलेले आहे. अध्यक्ष यांचा मुलगा कल्पक निपचंद शेरकी हे संस्थेचे संचालक आहे. ते पुण्यामधे कंपनीमध्ये नौकरीवर असतांना त्यांना संस्थेच्या संचालक मंडळ सभेला हजर दाखवुन त्यांची खोटी स्वाक्षरी मारुन उपस्थिती भत्ता उचलण्यात आलेले आहे, संस्थेचे यु.टी.आय.मधे नियमबाहय गुंतवणूक केलेली आहे. संस्थेला अधिकार नसतांना बेकायदेशिर यु. टी. आय. मधे मोठ्या प्रमाणात गुंतवणक केलेली आहे. कार्यरत संचालक मंडळातील बहुतांश संचालक अध्यक्ष यांचे नातेवाईक व कार्यक्षेत्राबाहेरील संचालक असल्याबाबत..
सच्या कार्यरत असलेल्या संचालक मंडळातील संचालक हे अध्यक्ष यांचे नातेवाईक आहे.तसेच संचालक बासुदेव गोपाळा पाल रा. फुटाणा ता पोंभुर्णा व केवराम खेवले रा.सावली ता. सावली हे दोनही संचालक कार्यक्षेत्राबाहेरील आहे याची संपूर्ण चौकशी व्हावी. व योग्य ती कार्यवाही करुन संपूर्ण संचालक मंडळ बरखास्त करावे तसेच संस्थेत प्रशासक बसवून निवडणूका घ्याव्या अशीही मागणी सभासदांनी केली आहे.
यावेळी सभासद गणेश गोहणे, रामदास चटारे, विनोद भरतकर, दिपक गोहणे, भारती राखडे, गुरुदास गोहणे आदिंची उपस्थिती होती.