Home आरोग्य कोरोना च्या तिसऱ्या लाटेपूर्वी उपजिल्हा रुग्णालयात बालरोगतज्ज्ञ ची नियुक्ती करा,भाजपा चे निवेदन

कोरोना च्या तिसऱ्या लाटेपूर्वी उपजिल्हा रुग्णालयात बालरोगतज्ज्ञ ची नियुक्ती करा,भाजपा चे निवेदन

9

कोरोना च्या तिसऱ्या लाटेपूर्वी उपजिल्हा रुग्णालयात बालरोगतज्ज्ञ ची नियुक्ती करा,भाजपा चे निवेदन

कामठी : कोरोना च्या तिसऱ्या लाटेचा सर्वाधिक प्रभाव लहान बालकांवर होण्याची शक्यता आरोग्य विभागा कडून वर्तविण्यात येत आहे
कोरोना ची तिसरी लाट येण्यापूर्वी कामठी उपजिल्हा रुग्णालयात उपाय योजना कराव्या अश्या मागणी चे निवेदन भाजपा शिष्टमंडळा च्या वतीने विधान परिषद सदस्य आमदार गिरीश व्यास यांना नुकतेच देण्यात आले
कामठी उपजिल्हा रुग्णालयात बालरोग तज्ञ ची नियुक्ती करण्यात यावी,आय सी यु कक्ष बनविण्यात यावे आणि रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांना जरुरी औषधोपचार करण्यात यावे,बांळतपणा साठी मेयो,मेडिकल, डागा रुग्णालयात रेफर करणे बंद करावे अश्या मागण्या निवेदनात करण्यात आल्या
निवेदन भाजपा कामठी शहराध्यक्ष संजय कनोजिया यांच्या नेतृत्वात देण्यात आले
निवेदना च्या प्रतिलिपि केंद्रीय मंत्री नितिन गडकरी,माजी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आमदार टेकचंद सावरकर यांना देखील देण्यात आल्या. निवेदन देणाऱ्या शिष्टमंडळात नगर परिषद विपक्ष नेता लालसिंग यादव, भाजपा कामठी शहर महामंत्री उज्वल रायबोले, राजकुमार हाडोती,विनोद संगेवार, नगरसेवक प्रतीक पडोळे, राजू पोलकमवार उपस्थित होते