विद्यार्थ्यांचा व्दारे अंमली पदार्थांच्या विरोधात जनजागृती रैली
कन्हान,ता.२६ जुन
कन्हान-पिपरी पोलीस स्टेशन अंतर्गत परिसरात दहावी व बारावीच्या शिकवणी वर्गातील विद्यार्थ्यांना पोलिसांच्या व्दारे अंमली पदार्थ वापर करण्यावर आळा घालण्यासाठी तसेच त्यांचे दुष्य परिणामकारक विषयी कार्यशाळा घेण्यात आली. तसेच मार्गदर्शन करून अंमली पदार्थाचे दुष्य परिणामाचे फलक लावुन जनजागृती रैली काढुन २६ जुन अंमली पदार्थ विरोधी दिवस म्हणुन साजरा करण्यात आला.

( दि.७) डिसेंबर १९८७ ला संयुक्त राष्ट्र संघटनेच्या झालेल्या आमसेभेत (दि.२६) जुन हा अंमली पदार्थाचे सेवन आणि बेकायदेशीर तस्करी विरुध्द आंतर राष्ट्रीय अंमली पदार्थ विरोधी दिवस पाळण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्या संबंधाने पो स्टे कन्हान व्दारे सोमवार (दि.२६) जुन २०२३ रोजी पोलीस स्टेशन हद्दीतील खाजगी शिकवणी मित्रा कोचिंग क्लासेस, गणेश नगर, मोढे कोचिंग, क्लासेस शिवनगर, कन्हान या दोन्ही स्थळी अंमली पदार्थ वापरा संबंधी आळा घालण्याबाबत तसेच त्यांचे होणारे दुष्यपरिणाम बाबत कार्यशाळा घेऊन गुन्हे शाखा पोलीस निरिक्षक यशवंत कदम यांनी विद्यार्थ्याना मार्गदर्शन केले.

खाजगी शिकवणी वर्गातील ८० मुले, मुली एकत्रित करून त्यां च्या हातात दोन फ्लैंग देवुन कन्हान शहरातील मुख्य रस्त्यानी रॅली भ्रमण करित पोलीस स्टेशन कन्हान येथे पोलीस निरिक्षक प्रमोद मकेश्वर यांच्या मार्गदर्शनाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. पोलीस स्टेशन कन्हान परीसरातील तारसा चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, पोलीस स्टेशन कन्हान परिसरात दर्शनिय स्थळी बॅनर लावण्यात आले तसेच स्थानिक गुन्हे शाखा नागपुर ग्रामिण येथुन प्राप्त झालेले बॅनर राष्ट्रीय महामार्ग क्र ४४ बंद टोल नाका येथे लावण्यात आलेले आहे.






