विविध ठिकाणी बैलपोळा व तान्हा पोळा मोठ्या उत्साहात साजराबळीराजाची गर्जना, झुकेगा नही, लढेगा…..

कन्हान, ता.28 ऑगस्ट
पारशिवनी तालुक्यातील कन्हान शहरात व ग्रामीण भागात मागील दोन वर्षे कोरोना संसर्गजन्यामुळे खंडीत झाला होता तो यावर्षी बैलपोळा व लाकडी नंदीचा दोन दिवसीय पोळा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. ग्रामीण भागात ठिकठिकाणी बैलपोळ्याचा दुसर्या दिवशी बडग्या-मारबत तसेच लाकडी नंदि बैलाच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. कन्हान व कान्द्री गावात मोठ्या बैल पोळयात विस ते तीस बैलजोड्या उपस्थित होत्या यावेळी स्वतः आत्महत्या न करण्याची व इतरांना न करू देण्याची शेतकऱ्यांनी सामुहिक शपथ घेतली. क्रांन्दी सरपंच बलवंत पडोळे यांनी संकटात असलेला माझ्या गावातील शेतकऱ्यांच्या पाठीशी मी खंबीरपणे उभा राहील अशी शपथ उपस्थित शेतकऱ्यांना दिली. यावेळी उपसरपंच श्यामकुमार बर्वे, गणेश सरोदे आदी शेतकरी उपस्थित होते.तसेच शुक्रवार रोजी कन्हान परिसरातील पिपरी, कांद्री, टेकाडी, निलज, येसंबा सह अनेक गावात बैलपोळा निमित्य कार्यक्रमाचे आयोजन करुन महिलांनी, नागरिकांनी बैलांची विधिवत पूजा अर्चना करून तोरण तोडुन प्रसाद वितरित करुन बैलपोळा साजरा करण्यातआला.
दुसऱ्या दिवशी लहान मुलांना लाकडी नंदी तान्हा पोळा तारसा रोड निर्णय प्रतिष्ठाण शिवनगर येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी रामभाऊ दिवटे व डाॅ.श्रीकृष्ण जामोदकर यांच्या हस्ते लाकडी नंदीची विधिवत पुजा, आरती व लहान मुलांचा खाऊ वाटप करून तान्हा पोळा उत्सव कार्यक्रमाला सुरूवात करण्यात आली. कार्यक्रमाचे संचालन निर्णय कुंभलकर व आभार प्रदर्शन ऋषी कोचे यांनी केले. यावेळेस कार्यक्रमाचे आयोजन सुर्यभान कुंभलकर व सुशील ठाकरे उपस्थित होते. यावेळी नरेश नाटकर, ज्ञानेश्वर हुड, ऋषी कोचे, निर्णय कुंभलकर, सुनिल सरोदे, शुभम कुंभलकर, कु.मोनिश हुड, कु.कुणाल भोंगाडे, मंमर चकोले, डाॅ.दापुरकर साहेब प्रमुख पाहुणे सुंनदा दिवटे, प्रतीभा कुंभलकर, इंदूबाई कोचे,पुष्पलता कुंभलकर, जया कुंभलकर, पुजा कुंभलकर, प्रीया कोचे, मोनाताई कोचे, श्वेता दिवटे, अरूणाताई बावनकुळे, त्रिवेणी सरोदे, अक्षय श्रावणकर, कल्पणा श्रावणकर, चंदभान कुंभलकर आदी उपस्थित होते.






