शेतकरी व गावक-यांना राख तलाव व कोळसा धुळ प्रदुर्शनापासुन पुर्णत: मुक्त करणार – मा.आदित्य ठाकरे
खापरखेडा ची राख व कोळशा खदान, कोल वासरी च्या धुळ प्रदुर्षन बंद करिता दिले निवेदन.

कन्हान,ता.28 ऑगस्ट
औष्णिक विद्युत केंद्र खापरखेडा येथील राख विसर्जन करण्याकरिता नांदगाव-बखारी शेत शिवारात पेंच नदीच्या अगदी जवळ राख तलाव असुन या राखे मुळे नांदगाव गावक-यांच्या व शेतक-यांच्या जनजीवनावर वाईट परिणाम होत असून योग्य मोहबदला न देता भंयकर समस्या निर्माण झाल्याने तत्काळीन पर्यावरण मंत्री मा. आदित्य ठाकरे यांनी तलावा मध्ये राख सोडणे कायमस्वरूपी बंद करून तलावातील ७०% राख बाहेर काढण्यात आली. असुन मुळ समस्या सोडवुन नांदगाव च्या ग्रामस्थ व शेतक-यांना पुर्णत: न्याय मिळवुन देण्याकरिता मी कटिबंध्य असुन सोबत असल्याचे युवासेना प्रमुख मा.आदित्य ठाकरे साहेब यांनी आपल्या भेटी दरम्यान ग्रामस्थाना हमी दिली.




