Home नागपुर आषाढी एकादशीला विठ्ठल-रुक्मिणी मुर्तीचे अभिषेक

आषाढी एकादशीला विठ्ठल-रुक्मिणी मुर्तीचे अभिषेक

9

आषाढी एकादशीला विठ्ठल-रुक्मिणी मुर्तीचे अभिषेक

कन्हान,ता.२९ जुन

   शहरातील शिवाजी नगर येथिल विठ्ठल रुक्मिणी मंदिरात विविध कार्यक्रमाने आषाढी एकादशी महोत्सव उत्साहाने थाटात साजरा करण्यात आला.

   गुरुवार ( दि.२९) जुन ला आषाढी एकादशी निमित्य शहरातील शिवाजी नगर, कन्हान येथे विठ्ठल रुक्मिणी मंदिरात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. सकाळी महिलांनी विठ्ठल रुक्मिणीच्या मुर्तीचे दही, दुधाने जल अभिषेक केले. तदंतर भाविक नागरिकांनी पुजा, अर्चना करून दुपारी मंदिरात सरस्वती भजन मंडळ कन्हान द्वारे भजन, कीर्तन करण्यात आले. कार्यक्रमाच्या शेवटी प्रसाद वितरण करुन परिसरात आषाढी एकादशी महोत्सव मोठ्या उत्साहाने थाटात साजरा करण्यात आला. प्रसंगी गीता भिलकर, भारती महल्ले, मीराबाई तिडके, सतीश लोडेकर, राजेंद्र बावणे, मनिष कुरडकर, अजय भोस्कर, उज्ज्वल तितरमारे, प्रकाश तितरमारे, अनुराग महल्ले, पवन राजुरकर, वंश बावणे, कृणाल राजपुत आदि सह भाविक नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते.