मुस्लिम बांधवा द्वारे मिरवणुक काढत ईद ए मिलाद महोत्सव शांततेत
कन्हान,ता.२९
प्रेषित हजरत मोहम्मद पैगंबर यांचा जयंती चे औचित्य साधुन कन्हान शहरात मुस्लिम बांधवा द्वारे मिरवणुक काढुन ईद ए मिलाद महोत्सव शांततेत व मोठ्या उत्साहात पार पडला.

गुरुवार (दि.२८) सप्टेंबर ला प्रेषित हजरत मोहम्मद पैगंबर यांचा जयंती चे औचित्य साधुन सुन्नी रजा मस्जिद कमेटी द्वारे ईद ए मिलाद निमित्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी ९ वाजता पटेल नगर, कन्हान येथील सुन्नी रजा मस्जिद येथे मुस्लिम समाज बांधव एकत्र येऊन सामुहिक नमाज पठण करण्यात आले . त्यानंतर सुन्नी रजा मस्जिद येथुन मिरवणुक काढुन पटेल नगर , शिवाजी नगर, धरम नगर होऊन राष्ट्रीय महामार्गावरील आंबेडकर चौक, तारसा चौक, धर्मराज शाळा, धन्यवाद गेट कांद्री होत राष्ट्रीय महामार्गाने भ्रमण करीत मिरवणुकी चे पटेल नगर सुन्नी रजा मस्जिद येथे समापन करण्यात आले. विविध समाजिक संघटन द्वारे फुलाच्या वर्षाने, शरबत, फळ, अल्पोहार वितरण करुन मिरवणुकी चे जोरदार स्वागत करण्यात आले. ईद ए मिलाद आणि अनंत चतुर्दशी एकाच दिवशी आल्याने कुठल्याही प्रकारची अनुचित घटना घडु नये म्हणुन कन्हान पोलीस निरीक्षक सार्थक नेहेते यांचा मार्गदर्शनात पोलीसांचा कडक बंदोबस्त तैनात करण्यात आल्याने कन्हान शहरात ईद ए मिलाद महोत्सव शांततेत मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.





