Home नवी दिल्ली ट्रक ने मागुन धडक दिल्याने दुचाकीस्वार गंभिर जख्मी,ट्रक चालक फरार

ट्रक ने मागुन धडक दिल्याने दुचाकीस्वार गंभिर जख्मी,ट्रक चालक फरार

7

*ट्रक ने मागुन धडक दिल्याने दुचाकीस्वार गंभिर जख्मी,ट्रक चालक फरार*

कमलसिह यादव
पाराशिवनी तालुका प्रतिनिधी


*पारशिवनी* (ता प्र):-पारशिवनी पोलिस स्टेशन ह्होत नागपूर-मनसर मार्गावरील आमडी फाट्यावरील इंडियन पेट्रोलपंपाजवळ ट्रकचालकाच्या निषकाळजीपणामुळे दुचाकीला मागुन धडक दिल्याने दुचाकी चालक गंभीर जखमी झाल्याची घटना शुक्रवारी सकाळी घडली. आमडी फाटा येथून दुचाकी क्र. एम. एच. ३१ / बी. क्यू. ९४८१ वरी दुचाकीस्वार गजानन मुलकर (वय ३0) रा. रामटेक मनसरकडे जात असताना मागुन येणारा ट्रक क्र. एम. एच. ४0 / बी. एल. २५६५ ने जबर धडक दिली.
त्यात दुचाकीस्वार हा गंभीररित्या जखमी झाला असून, त्याला उपचाराकरिता नागपूरच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याच्यावर उपचार सुरू आहे. तर घटनेतील ट्रकचालक हा घटनास्थळावरून ट्रक सोडुन पसार झाला. पारशिवनी पोलिस स्टेशन चे पुलिस निरिक्षक संतोप् वैरागडे यांचे मार्गदर्शानात पुढील तपास पारशिवनी पो. उप. निरीक्षक ज्ञानोबा पळनाटे करीत आहेत.