विद्यार्थींनी पोलीस जवानांना, वृक्षाला राखी बांधुन सण साजरा
कन्हान,ता. ३१
आर्दश हायस्कुल, कन्हान शाळेच्या विद्यार्थींनी पोलीस निरिक्षक, जवानांना आणि वृक्षाला राखी बांधुन रक्षाबंधन कार्यक्रम उत्साहात थाटात पार पाडला.

श्रावण पौर्णिमा दिवशी दरवर्षी रक्षाबंधनचा उत्सव साजरा केला जातो. भारतीय संस्कृतीत प्रमुख सणामध्ये ‘रक्षाबंधण’ सण भाऊ-बहिणीचा स्नेह व उत्सवाचे पर्व म्हणून साजरा केला जातो.देशभरात या सणाचे महत्त्व प्राप्त असून वेगवेगळ्या नावाने ओळख आहे. उत्तर भारतात ‘कजरी-पौर्णिमा, तर पश्चिम भारतातात ‘नारळी पौर्णिमा’ या नावाने सण साजरा केला जातो.

रक्षाबंधन महोत्सव निमित्य आर्दश हायस्कुल व आयडियल काॅ.हि.प्राथमिक शाळा यांच्या संयुक्त विद्यमाने रक्षाबंधन कार्यक्रमाचे आयोजन पोलीस स्टेशन येथे करण्यात आले.





