महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटना, पारशिवनी व्दारे बुट (जुते) वितरण
कन्हान,ता.14 ऑगस्ट
महाराष्ट्र पोलीस बाॅईज संघटना संपुर्ण महाराष्ट्रात अमृत महोत्सव निमित्त विविध कार्यक्रम आयोजित करीत आहे. त्याच अनुसंगाने संस्थापक अध्यक्ष राहुल दुबाले व नागपुर जिल्हाध्यक्ष लालसिंग यादव यांच्या मार्गदर्शनात महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटना पारशिवनी व्दारे पंडित जवाहरलाल नेहरू कन्या विद्यालय कन्हान, येथील गरजु विद्यार्थ्यांना बुट (जुते) वाटप करण्यात आले. “हर घर तिरंगा” अमृत महोत्सव कार्यक्रम अंतर्गत ध्वजारोहण करण्यात आले. याप्रसंगी केतन भिवगडे, अध्यक्ष राजे फाउंडेशन कन्हान, निलेश गाढवे अध्यक्ष महात्मा ज्योतिबा फुले बहुउद्देश्यीय संस्था टेकाडी, रोशन सोनटके, रितेश जनबंधु, नितीन बुराडे, प्रविण हुड सदस्य नेहरू युवा केंद्र, निकेश डेंगे, मनोज लक्षणे, कैलास बिरो, विजय हिंगणकर, जितु हिंगणकर, ताराचंद देवढगले, दादाराव डेंगे, ऋषिकेश देवढगले, महेश दिवटे, मदन वाघ, मोहन वकलकार, प्रविण शेलारे सामाजिक कार्यकर्ता, शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक कर्मचारी वृंद सह नगरवासी उपस्थित होते.