विदर्भ भुमिपुत्र संघटन कन्हान व्दारे ७५ व्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्य सोमवार (दि.१५) ऑगस्ट २०२२ ला सकाळी ९.३० ते दुपारी १ वाजे. पर्यंत तारसा रोड चौक महाकाली कॉम्पलेक्स कन्हान येथे भव्य रक्तदान व कोरोना बुस्टर डोज शिबीरांचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबीरात इंदिरा गांधी शासकिय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालय रक्त पेढी नागपुर, प्राथमिक आरोग्य केंद्र कन्हान तसेच तपस्या फाऊंडेशन रामटेक, एम.सी.एम. संविधानिक हक्क संघटन कन्हान, शिवराय ग्रुप खंडाळा यांचे विशेष सहकार्य लाभणार आहे. ७५ व्या भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्य कन्हान परिसरातील नवयुवकांनी रक्तदान करावे, तसेच १८ वर्षा वरील युवक नागरिकांनी स्वत:चा मोबाईल, आधार कार्ड सोबत आणुन बुस्टर डोज घेऊन रक्दान व बुस्टर डोज शिबीराचा मोठया संख्येने लाभ घ्यावा असे आवाहन विदर्भ भुमिपुत्र संघटन कन्हान अध्यक्ष शिवशंकर (चिंटु) वाकुडकर यांनी केले आहे. शिबीराच्या यशस्विते करिता रजनिश मेश्राम, समशेर पुरवले, सुनिल लक्षणे, भरत चकोले, आकाश नारनवरे, सोनु मसराम, हरिष तिडके, रामभैया थवानी, दिपक कुंभलकर, आशिष वानखेडे, शैलेश ढोके, मयुर माटे, मृणाल सरोजकर श्रीकृष्णा माकडे, विक्की उके, किशोर नांदुरकर, पंकज रामटेके, अनिल हटवार, शरद दुधपचारे, राजु चोपकर, जगन कारेमोरे, राधेशाम राऊत, अनिकेत नानोटे, मनोज बैठवार, पवन ठाकुर, करण पाली, सचिन कटरे, राकेश वानखेडे आदी परिश्रम करित आहे.