लोकशाहीर अण्णा भाऊ साठे जयंती, गुरूपुजा, सांस्कृतिक व सत्कार सोहळा थाटात साजरा

खडी गंमत, दंडार, भारूड, भजन व किर्तन या ग्रामिण लोककलेच्या कलावंतानी दिली उत्कृष्ट सलामी .
कन्हान,ता.14 ऑगस्ट
दक्षिण मध्य क्षेत्र सांकृतिक केंद्र नागपुर व विदर्भ शाहीर कलाकार परिषद कन्हान यांच्या संयुक्त विद्यमाने साहित्य रत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांची जयंती प्रित्यर्थ गुरूपुजा, सांस्कृतिक कार्यक्रमाने ग्रामिण लोककलेच्या लोक कलावंतानी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना उत्कृष्ट लोककला सादर करून दिली सलामी. पत्रकारांचा व कलावंताचा सत्कार सोहळासह हार्दीक मंगल कार्यालय कन्हान येथे अण्णा भाऊ साठे व स्व.शाहीर धर्मदास भिवगडे यांचा प्रथम पुण्यतिथी साजरी करण्यात आली.





