धर्मराज विद्यालयात स्वातंत्र्याचा “अमृत महोत्सव”

कन्हान,ता.14 ऑगस्ट
धर्मराज विद्यालय व विज्ञान कनिष्ठ महा विद्यालय कांन्द्री- कन्हान आणि पोलीस स्टेशन कन्हान यांच्या संयुक्त विद्यमाने (दि.९) ऑगस्ट पासुन सुरू झालेल्या “स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव” निमित्य विविध स्पर्धांचे पारितोषिक वितरण सोहळा संताजी सभागृहात संपन्न झाला.

याप्रसंगी प्रमुख अथिती म्हणुन उपविभागीय पोलीस अधिकारी कामठी विभाग एम.एम.बागबान, सहाय्यक पोलीस निरीक्षक, सहाय्यक सायबर सेल नागपुर ग्रामिण रवी म्हसकर, सहाय्यक सायबर सेल व महिला पोलीस उपनिरीक्षक कुमुदिनी पाथोडे, पोलीस निरीक्षक विलास काळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक पराग फुलझेले, प्रामुख्याने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक रमेश साखरकर यांनी भुषविले. सर्व प्रथम शाळेचे मुख्याध्यापक रमेश साखरकर आणि अनिल सारवे यांनी ध्वजारोहन करून भारत मातेच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले. हरित सेना द्वारे अनिल सारवे यांच्या मार्गदर्शनात विद्यार्थ्यांनी शाळेच्या परिसरातील सर्व झाडांना आणि सर्व शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचाऱ्याना राख्या बांधण्यात आल्या.





