विविध ठिकाणी बैलपोळा व तान्हा पोळा मोठ्या उत्साहात साजराबळीराजाची गर्जना, झुकेगा नही, लढेगा…..

कन्हान, ता.28 ऑगस्ट
पारशिवनी तालुक्यातील कन्हान शहरात व ग्रामीण भागात मागील दोन वर्षे कोरोना संसर्गजन्यामुळे खंडीत झाला होता तो यावर्षी बैलपोळा व लाकडी नंदीचा दोन दिवसीय पोळा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. ग्रामीण भागात ठिकठिकाणी बैलपोळ्याचा दुसर्या दिवशी बडग्या-मारबत तसेच लाकडी नंदि बैलाच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. कन्हान व कान्द्री गावात मोठ्या बैल पोळयात विस ते तीस बैलजोड्या उपस्थित होत्या यावेळी स्वतः आत्महत्या न करण्याची व इतरांना न करू देण्याची शेतकऱ्यांनी सामुहिक शपथ घेतली. क्रांन्दी सरपंच बलवंत पडोळे यांनी संकटात असलेला माझ्या गावातील शेतकऱ्यांच्या पाठीशी मी खंबीरपणे उभा राहील अशी शपथ उपस्थित शेतकऱ्यांना दिली. यावेळी उपसरपंच श्यामकुमार बर्वे, गणेश सरोदे आदी शेतकरी उपस्थित होते.





