राखेच्या प्रदूषणापासून करणार मुक्त
नांदगाव येथील शेतकऱ्यांना आदित्य ठाकरे यांचे आश्वासन; ७० टक्के राख काढण्यात आली

कन्हान, ता. २८ ऑगस्ट
शेतकरी व ग्रामस्थांना राखेपासून होणाऱ्या प्रदूषणापासून मुक्त करण्यात येईल, असे आश्वासन युवासेना प्रमुख आणि माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी दिले. नांदगाव-बखारी शिवारात पेंच नदीच्या जवळ राख तलाव असून येथील राखेमुळे नांदगाव परिसरातील शेती आणि ग्रामस्थांच्या जीवनावर वाईट परिणाम होत आहे. या परिसराला आदित्य ठाकरे यांनी रविवारी भेट देऊन पाहणी केली. याप्रसंगी त्यांनी ग्रामस्थांसोबत चर्चा करताना आश्वासन दिले.





