Home Breaking News शेतात असलेल्या विस हजारांच्या साहित्याची चोरी

शेतात असलेल्या विस हजारांच्या साहित्याची चोरी

8

 

शेतात असलेल्या विस हजारांच्या साहित्याची चोरी

कन्हान,ता.03 सप्टेंबर

      कन्हान शहराचा हद्दीत असलेला बोरडा टोल नाक्या बाजुचा शेतातील खोली मध्ये अज्ञात युवकांनी एकुण विस हजार रुपयांचा मुद्देमाल चोरुन पसार झाल्याने पोलीसांनी अज्ञात आरोपी विरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली.

    ही घटना रविवार (ता.28) ऑगस्ट सांयकाळी पाच वाजता ते सोमवार (ता.29) ला दुपारी अकरा वाजताच्या सुमारास घडली. उमेश विठ्ठलराव कावळे (६२) रा.खरबी, नागपुर यांची बोरडा टोल नाका कॅनलला लागुन पावणे पाच एकड शेतात धान पिक घेतलेले आहे. त्यामुळे शेतात सामान ठेवण्याकरीता खोली बनवलेली होती. याकरीता आठवड्यातुन दोन-तीन दिवस यायचे. रविवार (दि.२८) रोजी उमेश कावळे हे शेतामध्ये आले असता त्यांना शेतामध्ये खुल्या जागेत असलेली खोली उघडी दिसली व आत प्रवेश करून पाहणी केली असता खोली मध्ये असलेली ५ एच.पी. हाऊस पावर मशीन किंमत १४,००० रु, ४ खताची बॅग किंमत ५,४०० रु, व दोन प्लाॅस्टिक चेअर किंमत ६०० रु. असा एकुण २०,००० हजार रुपयांचा मुद्देमाल अज्ञात युवकांनी चोरून नेल्याने पोलीसांनी उमेश कावळे यांच्या तक्रारी गुन्हा दाखल करून पुढील तपास पोलीस निरीक्षक विलास काळे यांच्या मार्गदर्शनात कन्हान पोलीस करीत आहे .