श्री दत्तात्रय जयंती महोत्सव विविध कार्यक्रमांनी साजरा

कन्हान,ता.९ डिसेंबर
कांद्री – कन्हान परिसरातील श्री दत्त मंदिरात श्री. दत्तात्रैय जयंती महोत्सव श्रीमद भागवत पारायण, हरिपाठ, काकडा भजन, रामायण पाठ, हरिभजन व पालखी मिरवणुकी सह आदि विविध कार्यक्रमाने श्री. दत्तात्रैय जयंती सोहळा साजरा करण्यात आला.

मार्गशिर्ष शुक्ल पक्ष ८ गुरुवार (दि.१) डिसेंबर २०२२ ला कांद्री येथे श्री.दत्त मंदिरात दुपारी १२ वाजता घटस्थापना करण्यात आली. दररोज सकाळी ज्योत ६ ते ७, काकडा भजन दुपारी १२.३० ते २.३०, रामायण पाठ महिला मंडळ कांद्री तर्फे करण्यात आले. दररोज सायंकाळी ४ ते ६ श्रीमद भागवत पारायण कथा सादरकर्ते ह.भ.प. सौ.कल्पनाताई विजयजी देशमुख, हरिपाठ हरिभजन अरुणोदय भजन मंडळ कांद्री, दुर्गा भजन मंडळ, गुरूदेव भजन मंडळ कांद्री, दुर्गा जस भजन मंडळ टेकाडी, दुर्गा भजन मंडळ, श्री दत्त भजन मंडळ कांद्री, विठ्ठल रुख्मिनी भजन मंडळ टेकाडी व श्री गजानन महाराज भजन मंडळ कांद्री विक्रमजी वांढरे व संच जागृती हरिभजन कांद्री व्दारे भजन किर्तन करण्यात आले.





