Home नागपुर कन्हान शहर विकास मंच द्वारे पुर्व पंतप्रधान वाजपेई यांची जयंती साजरी

कन्हान शहर विकास मंच द्वारे पुर्व पंतप्रधान वाजपेई यांची जयंती साजरी

11

कन्हान शहर विकास मंच द्वारे पुर्व पंतप्रधान वाजपेई यांची जयंती साजरी

कन्हान,ता.२६ डिसेंबर

     शहर विकास मंच द्वारे देशाचे पुर्व पंतप्रधान भारतरत्न श्रद्धेय स्व.अटल बिहारी वाजपेई यांच्या जयंती निमित्य कार्यक्रमाचे आयोजन गांधी चौक येथे करून जयंती थाटात साजरी करण्यात आली.

       कार्यक्रमास प्रामुख्याने उपस्थित कन्हान शहर विकास मंच चे नवनिर्वाचित सदस्य नरेश शेळके यांच्या हस्ते अटल बिहारी वाजपेई यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली. यावेळी मंच मार्गदर्शक भरत सावळे, प्रभाकर रुंघे, ताराचंद निंबाळकर यांनी अटल बिहारी वाजपेई यांच्या जीवन चिरित्र्यावर उपस्थितांना मार्गदर्शन केले . कार्यक्रमास उपस्थित सर्व मंच पदाधिका-यांनी अटल बिहारी वाजपेई यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पित करित विनम्र अभिवादन करून जयंती थाटात साजरी कर ण्यात आली. याप्रसंगी कन्हान शहर विकास मंच संस्थापक अध्यक्ष ऋृषभ बावनकर, सचिव प्रणय बावनकुळे, भरत सावळे, प्रभाकर रुंघे, ताराचंद निंबाळकर, नरेश शेळके, अंकुश शेंडे सह मंच पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.