पेंच पाटबंधारे चा बोरी (सिंगोरी) गावात कालवा फुटल्याने शेतकऱ्यांच्या शेतपिकाचे नुकसान
शेतक-यांच्या ८० एकरावरील गहु व हरभरा पिक पाण्यात बुडुन नुकसानीने शेतकरी हतबल.

कन्हान,ता.२८ डिसेंबर
तालुकातिल पेंच पाटबंधारे विभागांतर्गत येणाऱ्या टेकाडी उपविभागातील बोरी (सिंगोरी) गाव शेतशिवारातील कालवा फुटल्याने गावातील १६ ते २० शेतकऱ्यांचे उभे असलेले गहु व हरभरा पिके पुर्णपणे पाण्यात बुडाल्याने शेतपिक उद्ध्वस्त झाल्या ने शेतकरी हतबल झाला आहे.

मंगळवार (दि.२७) ला सकाळी शेतकरी शेतात गेले तर त्यांच्य शेतात पाणीच पाणी साचुन शेत पिक पाण्यात बुडाली बघायला मिळाले. त्यांच्या शेतातील गहु, हरभरा पिकांमध्ये पाणी शिरले पाहुन त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. शेतकऱ्यांनी सकाळी आठ वाजता पाटबंधारे अधिकाऱ्यांना कळवले. त्यांनी थेट शेतकऱ्यांशी उलट बोलणे सुरू केले. याबाबत तहसिलदार प्रशात सांगळे यांना माहिती दिली.





