Home Breaking News नेताजी सुभाषचंद्र बोस व हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन

नेताजी सुभाषचंद्र बोस व हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन

10

नेताजी सुभाषचंद्र बोस व हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन

कन्हान,ता.२३ जानेवारी

    नेताजी सुभाषचंद्र बोस व हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त सोमवार (दि.२३) जानेवारी रोजी नगर परिषद कन्हान-पिपरी कार्यालय येथे कार्यक्रम‌ पार पडला. प्रसंगी मान्यवरांच्या हस्ते नेताजी सुभाषचंद्र बोस व हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करून व दीप प्रज्वलित करून विनम्र अभिवादन करण्यात आले. यावेळी कन्हान-पिपरी नगराध्यक्षा सौ. करुणाताई आष्टणकर, मुख्याधिकारी श्रीमती अर्चना मेंढे, नगरसेवक राजेंद्रजी शेंदरे, विनयजी यादव, नगरसेविका रेखाताई टोहणे, डायनल शेंडे आणि न.प.अधिकारी व कर्मचारी फिरोज बिसेन, पापु अभियंता, लेखापाल पंकज खवसे, हर्षल जगताप अग्नि पर्यवेक्षक, श्रीमती प्रिया शिरसाठ संगणक, अभियंता कु.प्रांजली सांभारे कनिष्ठ लिपिक देवीलाल ठाकूर, कनिष्ठ लिपिक श्रीमती मनीषा लाहोरी, भिमराव मेश्राम, शुभम येलमुले, आशिक पात्रे व इतर कार्यालयीन कर्मचारी यांनी उपस्थित राहून प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून वंदन केले.