रामसरोवर टेकाडी येथे आखाडा अभ्यास स्पर्धा व पत्रकारांचा सत्कार

कन्हान,ता.२३ जानेवारी
गुरूकृपा मर्दानी आखाडा टेकाडी व्दारे रामसरोवर शितला माता मंदीर ये़थे टेकाडी, निमखेडा येथील शिवकला मर्दानी आखाडा (दांडपट्टा) खेडाळु चा एक दिवसीय अभ्यास व स्पर्धा घेऊन कन्हान च्या पत्रकारांचा सत्कार सोहळा पार पडला.

रविवार (दि.१५) जानेवारी ला सकाळी शिवसेना माजी खासदार मा.प्रकाश भाऊ जाधव यांचे अध्यक्षेत व प्रमुख अतिथी जेष्ट पत्रकार एन एस. मालविये सर, अजय त्रिवेदी, मोतीराम रहाटे, दिलीप राईकवार यांचे हस्ते शितला माता, श्रीराम पादुका, छत्रपती शिवाजी महाराज, बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पुजन, पुष्पहार अर्पन करून कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली.

सर्व प्रथम मान्यवरांचे पुष्प देऊन स्वागत करू न पारंपारिक शिव कालीन मर्दानी आखादा (दांड पट्टा ) १४ व १७ वर्ष आंत खेडाळुनी अभ्यास, प्रशिक्षण देत स्पर्धा घेऊन विजयी खेडाळुना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. याप्रसंगी मा.एन एस मालविये व माजी खासदार प्रकाश भाऊ जाधव यानी दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर आणि पारंपारिक शिव कालीन आखाडा, शस्त्र कला विषयी उपस्थिताना मार्ग दर्शन केले.





