व्यक्तीमत्व फुलवण्यासाठी कठोर मेहनत घ्या-मिलिंद वानखेडे
धर्मराज प्राथमिक शाळेत विद्यार्थी उत्सव स्नेह संमेलन

कन्हान,ता.२७ जानेवारी
बालवयातच व्यक्तीमत्वाचे अंकुर फुलते. त्यामुळे आपल्या मुलांचे चांगले व्यक्तीमत्व घडविण्यासाठी शिक्षकांसोबतच पालकांनी सुध्दा कठोर मेहनत घ्यावी, असे आवाहन विद्यार्थी उत्सवाचे उद्घाटक शिक्षक नेते श्री.मिलिंद वानखेडे यांनी केले.

धर्मराज प्राथमिक शाळेत विद्यार्थी उत्सव स्नेहसंमेलनाचे उद्घाटक म्हणुन शिक्षक नेते श्री.मिलिंद वानखेडे तर अध्यक्षस्थानी धर्मराज विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री.रमेश साखरकर उपस्थित होते. प्रमुख पाहुणे म्हणुन मुख्याध्यापक श्री.खिमेश बढिये, पालक प्रतिनिधी श्री. विधिलाल डहारे, परिवहन समिती अध्यक्ष श्री.गज्जु बल्लारे, पर्यवेक्षक श्री.सुरेंद्र मेश्राम, पालक प्रतिनिधी सौ.सोनुताई पोटभरे, माध्यमिक विभागाचे ज्येष्ठ शिक्षक श्री.दिनेश ढगे उपस्थित होते.





