शाहीर ब्रम्हा नवघरे यांचे शाल व सन्मानचिन्ह देऊन सत्कार
मंडई निमित्त नेरला येथे सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन
नागपूर,ता.१ फेब्रुवारी
मौदा तालुक्यातील नेरला येथे मंडई निमित्त सांस्कृतिक कार्यक्रमांचे शुक्रवार ( दि.२७) रोजी आयोजन करण्यात आले होते. सांस्कृतिक कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात कलावंत सहभागी होऊन लोकांचे लक्ष वेधले होते. रामटेक विधानसभा क्षेत्राचे कॉग्रेस नेते चंद्रपालजी चौकसे (अध्यक्ष, राष्ट्रीय पंचायती राज ग्रामप्रधान सरपंच संघटन महाराष्ट्र राज्य तथा पर्यटक मित्र रामटेक) यांनी भेट दिली. चंद्रपाल चौकसे लोकसेवा प्रतिष्ठान रामधाम (मनसर) तर्फे शाहीर ब्रम्हा नवघरे यांचे शाल व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आले. यावेळी शाहीर राजेंद्र बावनकुळे, पी.टी. रघुवंशी, नासिर शेख, अनिल मनगटे, शाहीर भगवान लांजेवार, चिरकुट पूंडेकर,गजानन वडे, भीम शाहीर प्रदीप कडबे, सुखदेव भिवगडे, मनोहर भिवगडे, मारोती काकडे, मारोती कडू, गणपत चोपकर, मनोज कडू, राहुल भिवगडे, सचिन भिवगडे, राजेश गेडाम, शाहीर सुरज नवघरे, ताराचंद भिवगडे, दामोधर पडोळे, पुरुषोत्तम चोपकर, ग्यानी रोहणकर, प्रमोद कडू, ज्ञानेश्वर नाटकर, प्रभाकर भिवगडे व गावकरी मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.