आठवळी बाजारात तरुणांच्या टोळीने तलवारी फीरवत धुमाकूळ
टोळीने स्थानिक नागरिकांसह दुकानदारांवर व पोलिसांवर हल्ला
पो.विभागीय अधिकारी व ठाणेदार यांच्यावर कारवाईची मागणी

कन्हान ता,४ फेब्रुवारी
पारशीवनी तालुक्यातील कन्हान शहरातील आठवडी बाजारात तरुणांच्या टोळीने स्थानिक नागरिकांसह दुकानदारांवर तलवारीने हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली. नागरिकांनी या घटनेचा विरोध करत राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४४ वर रास्ता रोको केल्याने पोलीस स्टेशन मध्ये तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. प्रकरण अधिकच चिघळत असल्याचे पाहून आमदार आशिष जैस्वाल, पोलिस अधीक्षक विशाल आनंद, नगराध्यक्ष सौ.करुणा आष्टणकर आणि उच्चपदस्थ अधिकारी घटनास्थळी पोहोचून जमावाला शांत केले.

शुक्रवारी संध्याकाळी बारा ते पंधरा तरुणांची टोळी शस्त्रांसह परिसरात दाखल झाली आणि त्यांनी महामार्ग क्रमांक ४४ वर असलेल्या दुकानदारांसह स्थानिक नागरिकांवर हल्ला चढवला. १२ ते १५ तरुणांनी हवेत तलवारी घेऊन दुभाजकावर उभे राहून तलवारीने वार केला, पायदळ एका व्यक्तीलासुद्धा तलवारीचा वार झाला, काही जणांना किरकोळ दुखापत झाली, मात्र ते पोलिसांच्या गोंधळात न पडता तेथून निघून गेले तर दुसरीकडे महिला घाबरून सेरावैरा पळून गेल्या, लहान मुले फीरत असताना पळून गेली, गरीब पुरुषांच्या दुकानातील सामान लुटले.

या हल्ल्यात अनेक नागरिक जखमी झाले असून मदतीसाठी आलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांवरही या तरुणांच्या टोळीने हल्ला केल्याची माहिती आहे. या प्रकरणाची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक विशाल आनंद, पोलीस उपअधीक्षक, विभागीय अधिकारी मुक्तार बागवान, कन्हान ठाणेदार विलास काळे यांनी घटनास्थळी पाहणी केली.तर दुसरीकडे रामटेकचे आमदार आशिष जैस्वाल यांनी पोलिस अधीक्षक विशाल आनंद यांच्या समक्ष पोलिस विभागीय अधिकारी मुख्तार बागवान यांच्यासह पोलिस निरीक्षक विलास काळे यांनी कन्हान परिसरात वाळू, कोळसा, ड्रग्जसह, जुगार, सट्टेबाजीचा धंदा वाटून देऊन आरोपींचा पुडका असून सामान्य माणसाची दखल घेतलेली जात नसल्याचा सांगत चांगलीच कान उघडनी केली. दोन महिन्यांपूर्वी तडीपारची शिक्षा भोगून तरुण परतल्याची चर्चा असून त्यांने पोलिसांच्या मदतीने जुआ परीसरात सुरू असताना नागपूर गुन्हे शाखेनी कारवाई करून बंद केले. त्यामुळे आपल्या बद्दल माहिती सतरापूर येथे सुरू असलेल्या तरुणांनी टीप दिल्याचे भासुन टोळीने त्यांच्या वर सुद्धा हल्ला केल्याची परीसरात चर्चा आहे. यानंतर शुक्रवारी आठवळी बाजारात दहशत निर्माण केली.






