आदिवासी समाज बांधवांनी प्रेत खाली ठेवून पोलीस स्टेशनच्या घेराव
जमावाला पांगवण्याचा नादात पोलिसांनी प्रेत स्वतः खांद्यावर घेऊन ओढाताण
दोषी पोलिसांवर सात दिवसांत कारवाईची मागणी – माजी खासदार प्रकाश जाधव

कन्हान,ता.१९ फेब्रुवारी
पारशीवनी तालुक्यातील कन्हान शहरातील परिसरात आठवडी बाजारात काही गुंडांनी (दि.३) फेब्रुवारीला धुमाकूळ घातला होता. ज्याची दखल घेत आमदार आशीष जैस्वाल यांनी पोलीस अधिकाऱ्यावर अवैध धंद्याच्या बोलबाला व वसुली सुरू असल्याच्या आरोप करून भर चौकात सुनावले होते. घटनेनंतर काही आरोपीच्या नावे तक्रार होत्या तपासासाठी पोलिसांनी आरोपीच्या नातेवाईकांना ताब्यात घेऊन विचारपूस केली. विकी उर्फ राहुल सलामे (वय३०) याला ताब्यात घेऊन चोप दिल्याचा आरोप नातेवाईकांच्या आहे. त्याला उपचारार्थ नागपूर येथील मेओ हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. पोलीसांनी आपल्या अधिकाराचा गैरवापर करून मारहाण केल्याने राहुलचा परिवार चिंतेत होता. (दि.१७) फेब्रुवारीला रात्री दहा वाजता राहुलचा उपचार दरम्यान मृत्यू झाला.

राहुल सलामेच्या नागपूर रूग्णालय मधून चौवीस तासांनंतर मृत देह कुटुंबाच्या स्वाधीन झाल्यानंतर आदीवासी समाज बांधवांनी व माजी खासदार प्रकाश जाधव यांच्या नेतृत्वात कांग्रेस अध्यक्ष नरेश बर्वे, रमेश कारेमोरे, उपसरपंच श्याम बर्वे, नगरसेवक योगेश रंगाची, नगरसेवक मनीष भिवगडे व कन्हान शहरातील हजारो संख्येने उपस्थित जनसमुदायाने कन्हान पोलीस स्टेशन समोर मृत राहुल सलामे यांचे प्रेत खाली ठेवून पोलीस विभाग विरूद्ध आक्रमक भूमिका घेतली. पोलिस कर्मचारांनी जमावाला पांगवण्यासाठी लाश स्वतःचा खांद्यावर घेऊन लाशीला रोडाचा पलीकडे नेऊन ठेवले. जमावाची व कुटुंबातील सदस्यांची चर्चा तासभर चालत असे पर्यंत प्रेत रस्त्यावर होती. मेल्यानंतरही मृतदेहाची अवहेलना झाल्याची दिसून आली.





