Home Breaking News २५ वर्षीय युवकाची गळफास घेऊन आत्महत्या ; सावनेर येथिल घटना

२५ वर्षीय युवकाची गळफास घेऊन आत्महत्या ; सावनेर येथिल घटना

10

सावनेर : सावनेर येथील एका 25 वर्षीय पियुष सावनकर युवकाने खेडकर ले आऊट येथिल स्वतःच राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली, ही धक्कादायक घटना रविवार रात्री अंदाजे 10.30 चा दरम्यान घडली, याबाबत घटनेची माहिती परिसरात राहणारे लोकांनी सामाजिक कार्यकर्ते हितेश बनसोड यांना दिली, लगेच त्यांनी सावनेरचे पोलीस निरीक्षक मारुती मुळक सरांना माहिती देण्यात आली, घटनेचे गांभीर्य लक्षात घेता पोलीस अधिकारी कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले,

मृतदेह सामाजिक कार्यकर्ते हितेश बनसोड यांचा मदतीने खाली उतरून पंचनामा करण्यात आला,

मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी सावनेर रुग्णालय येथे दाखल केला, डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले असता, मृतदेह विच्छादन करिता रवाना करण्यात आला, पुढील तपास सावनेर पोलीस स्टेशन करीत आहे