रेल्वे मालधक्का स्थानांतरण करण्यासाठी ठीया आंदोलन

कन्हान,ता.०५ मार्च
कन्हान शहरातील मुख्य गवहीवरा टी पॉइंट,चौकात असलेला रेल्वे माल धक्कया मुळे स्थानिक नागरिकांसह, लहान मुलांना व वृद्ध व्यक्तींना मालवाहतूक मोठ्या प्रमाणात सुरू असल्याने धुळीचा विविध आजारांची समस्या निर्माण झाल्याने स्थानिक नागरिकांनी रस्त्यावर वाहतूक थांबवून ठीया आंदोलन केले.

मालधक्का, कन्हान येथे चालत असलेल्या वाहनामुळे मोठ्या प्रमाणात धूळ निर्माण होतो. ज्या कारणाने स्थानिक नागरिकांना अस्थमा, दम लागणे , त्वचा शारीरिक व मानसिक तणावात जगत अशा अनेक आजारांचा सामना करावा लागत आहे. या सर्व गंभीर विषयांचा विरोधात शिवशंकर (चिंटू) वाकुडकर व स्थानिक नागरिकांनी मालवाहतूक ट्रक रस्त्यावर थांबवून गेट समोर ठीया आंदोलन केले. स्थानिक आंदोलन करत्यानी ठेकेदार यांना फटकार लावल्या नंतर ठेकेदार यांनी त्वरित ट्रॅकर आणून धूळ दूर करण्याचे प्रबंध केले.





