मूकबधीर विद्यार्थ्यांची जिल्हास्तरीय बॅडमिंटन स्पर्धा संपन्न.
सावनेर : मंगल बहुउद्देशीय शिक्षण,तांत्रिक शिक्षण व प्रशिक्षण संस्था नागपूर द्वारा संचालित मूक बधिर निवासी शाळा सावनेर च्या वतीने मूक बधिर विद्यार्थ्यांकरीता जिल्हास्तरीय आंतरशालेय बॅडमिंटन स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.या स्पर्धा क्रीडा संकुल सावनेर येथे संपन्न झाल्या.बॅडमिंटन स्पर्धेच्या उदघाटनाला प्रमुख पाहुणे म्हणून प्रा डॉ.योगेश पाटील,संस्थेचे अध्यक्ष प्रशांत डवले,सचिव नारायण समर्थ,शाळेचे वैद्यकीय मार्गदर्शक डॉ.अमित चेडे,शाळेच्या प्रशासकीय अधिकारी मंगला समर्थ, मुख्याध्यापिका सुवर्णा महाशब्दे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.मान्यवरांच्या हस्ते फीत कापून स्पर्धेचे उदघाटन करण्यात आले.





