कन्हान नदी नविन पुलाच्या दोन कप्याच्या जोड मध्ये धोकादायक अंतर
नविन पुलावरील गड्डे,भेगा,दोन कप्याच्या जोड मध्ये वाढलेले अंतराने बांधकामावर प्रश्नचिन्ह

कन्हान,ता.३० मार्च
नदीवर नवनिर्मित पुलाचे उद्घाटन होऊन फक्त सहा महिने झाले असता पुलावर दोन ते तीन वेळा मोठ मोठे गड्डे पडले. आता कप्याच्या जोड मध्ये चांगले अंतर वाढुन धोकादायक परिस्थिती असल्याने राष्ट्रीय महामार्ग अधिकारी यांचे कार्यप्रणाली आणि पुलाचा बांधकामावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले. माजी खासदार प्रकाश भाऊ जाधव यांनी अधिकारी यांना पुलाची समस्या दाखवुन चर्चा करुन दहा दिवसांत नविन पुलाचे व्यवस्थित काम करण्याची मागणी केली. अन्यथा उग्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.

कन्हान नदी नवनिर्मित पुलाचे भुमिपुजन २०१४ साली तत्कालीन केंद्रीय मंत्री मा.ऑस्कर फर्नांडिस यांच्या हस्ते व तत्कालीन खासदार मुकुल वासनिक यांचा प्रमुख उपस्थितीत करण्यात आले होते. नविन पुल ३ वर्षात पुर्ण होण्याचे आश्वस्त केल्यानंतर मध्यंतरी घडलेल्या राजकीय घडामोळीने पुलाचे कार्य संधगतीने सुरु होते. पुलाचे बांधकाम ताराकुंड कंपनी द्वारे करण्यात आले. पुलाच्या बांधकामा ला जवळपास आठ वर्ष लागली.





