आंबेडकर चौक,कन्हान येथे मा.शरद पवार यांचे जोरदार स्वागत

कन्हान,ता.०२ एप्रिल
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा.शरद पवार यांचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकार्यांनी आंबेडकर चौक येथे भव्य स्वागत करण्यात आले.

मा.शरद पवार साहेब भारताच्या केंद्रीय मंत्रिमंडळात संरक्षण मंत्री आणि कृषी मंत्री राहिले असुन महाराष्ट्र राज्याचे तीन वेळा मुख्यमंत्री सुद्धा राहिले आहेत. त्यांनी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे अध्यक्ष पद भूषवले आहे. रविवार (दि.२) एप्रिल रोजी मध्यप्रदेश, शीवनी येथे विरसा ब्रिगेड अधिकार परिषद कार्यक्रमात सहभागी होणार होते. सकाळी १० वाजता कन्हान आंबेडकर चौक येथे मा.शरद पवारसाहेब, राज्याचे माजी गृहमंत्री मा.अनिल देशमुख , माजी मंत्री मा.छगन भुजबल, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा अध्यक्ष मा.शिवराज बाबा गुजर यांचे आगमन झाले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विविध आघाड्यांचा पदाधिकार्यांनी व सदस्यांनी फुलाच्या वर्षाने, ढोल ताशाच्या गजरात फटाके फोडुन, पुष्प गुच्छ देऊन जोरदार स्वागत करण्यात आले.





