Home नागपुर महानत्यागी बाबा जुमदेव यांच्या जयंती निमित्य कार्यक्रम

महानत्यागी बाबा जुमदेव यांच्या जयंती निमित्य कार्यक्रम

10

महानत्यागी बाबा जुमदेव यांच्या जयंती निमित्य कार्यक्रम

कन्हान,ता.०२ एप्रिल

     बाबा हनुमानजी सेवक संस्था कन्हान – पिपरी द्वारे संस्थापक महानत्यागी बाबा जुमदेवजी यांच्या १०२ व्या जयंती निमित्य दोन दिवसीय विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे .

    सोमवार (ता.३) एप्रिल रोजी महानत्यागी बाबा जुमदेव यांचा जयंती निमित्य महानत्यागी बाबा जुमदेव ग्राम स्वच्छता अभियान घेण्यात येणार आहे. मंगळवार (ता.४) एप्रिल रोजी सकाळी ५:३० वाजता सामुहिक हवन , ८:०० वाजता भव्य शोभायात्रा , दुपारी १२:०० वाजता महानत्यागी बाबा जुमदेवजींचे स्वागत , १:०० वाजता मान्यवरांचे स्वागत, १:३० वाजता भगवत कार्याची चर्चा बैठक, सायंकाळी ५:०० वा. पासुन भोजन ग्रहण करुन कार्यक्रमाची सांगता करण्यात येणार आहे.

    दोन दिवसीय कार्यक्रमात शहरातील सर्व सेवक, सेवकांनी, आणि नागरिकांनी मोठ्या संख्येत उपस्थित राहावे असे कडकडीचे आव्हान आयोजकांनी केले आहे. कार्यक्रमाचे आयोजक आणि यशस्वितेकरिता संस्थेचे अध्यक्ष गोपीचंद सावरकर, उपाध्यक्ष संजय भैस, कोषाध्यक्ष दिनेश देशमुख, सहसचिव मानिकजी पोटे सह आदि सदस्य परिश्रम घेत आहे.