” *कर्करोग निदान शिबीर यशस्वीरित्या संपन्न* “
(लायन्स क्लब व आय. एम. ए. चा संयुक्त उपक्रम)
*सावनेर* : जागतिक आरोग्य दिनाचे औचित्य साधून स्थानिक लायन्स क्लब आणि इंडियन मेडिकल असोसियेशन यांचे संयुक्त विद्यमाने निशुल्क शिबिराचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते. सर्वांसाठी आरोग्य संकल्पनेवर आधारित या शिबिराच्या उदघाटन समारंभाचे अध्यक्षपद डॉ. सौ. ज्योत्सना धोटे यांनी भूषविले तर ऍड. पल्लवी मुलमुळे विशेष अतिथी म्हणून उपस्थित होत्या. डॉ. संगीता जैन यांनी प्रामुख्याने मार्गदर्शन केले. आधुनिक जीवनशैली, असंतुलित आहार, योग्य व्यायामाचा अभाव, धूम्रपान, अनुवांशिकता, प्रदूषण, कमजोर प्रतिकार शक्ती, औषधंचे अतिसेवन या आणि अशा अनेक कारण मुळे कर्करोग बळावतो असा सुरु मान्यवरांनी व्यक्त केला. कर्करोग लक्षान्नाची माहिती करून घेणे आणि वेळीच डॉक्टरांचा सल्ला घेणे महत्वाचे असल्याचे नमूद केले.
रा. तुकडोजी कँसर हॉस्पिटल येथील तज्ञाच्या उपस्थितीत जवळपास शंभर व्यक्तींच्या मुख, स्तन, गर्भाशय चाचण्या करण्यात आल्या.





