कन्हान शहरात वेकोलिच्या कोळसा व माती डम्पींग मुळे धुळीचे साम्राज्य
वेकोलिच्या विरोधात मोठे जनआंदोलन होण्याची दाट शक्यता
महाराष्ट्र प्रदुर्शन नियंत्रक मंडळांच्या अधिकाऱ्यांवर प्रश्नचिन्ह

कन्हान,ता.२० एप्रिल
शहरालगत असलेल्या कामठी खुली कोळसा खदानच्या माती डम्पींग मुळे मोठमोठया कुत्रिम टेकडया तयार झाल्या असुन याच कुत्रिम टेकडयावर मोठया व्हॉल्वो ट्रक ने कोळसा व माती डम्पींग मोठ्या प्रमाणात सुरू आहे.

कन्हान- पिपरी शहरातील दाट लोक वस्तीत दुरवर मातीचे कण उडुन मोठया प्रमाणात धुळीचे वातावरणात चादर निर्माण होऊन नागरिकांच्या आरोग्यावर, जिवनमानावर दुष्परिणाम होत आहे. नागरिकांना धुळीचा भयंकर त्रास असुन सुध्दा महाराष्ट्र प्रदुर्शन नियंत्रक मंडळ व अधिकारी मुंग गिळुन गप्प का आहे ? अशी संप्तत चर्चा नागरिकांच्या चर्चेतुन सामोर येत आहे.

वेकोलि कामठी उपक्षेत्र अंतर्गत कामठी व इंदर खुली कोळसा खदान ही दाट लोकवस्तीच्या कन्हान- पिपरी शहरालगत असुन कोळसा खदान च्या कोळसा उत्खनना करिता ५०० फुट खोलीच्या वर माती खोदुन कोळस्याचे उत्खनन करण्याचे काम खाजगी कंत्राटदार करित आहे. कंत्राटदार जास्त नफा मिळविण्या करिता खदानची माती दुर लांब न टाकता जवळच कोळसा व माती डम्पींग करून उंचच उंच कुत्रिम टेकडया तयार करित आहे. शहरालगतच्या उंच मोठमोठया टेकडयावर पाणी न मारता मोठया व्हॉल्वो ट्रक ने माती डम्पींग करित असल्याने ही माती हवेने उडुन कन्हान शहरातील अशोक नगर, सुरेश नगर, राय नगर, संताजी नगर, नाकां नं ७, शिवनगर, इंदिरानगर, आंनद नगर, राधाकृष्ण नगर, हनुमान नगर, लोहिया लेआऊट , रामनगर, गणेशनगर, स्टेशन रोड, सत्रापुर, विवेकांनद नगर, पटेल नगर, शिवाजी नगर, धर्मनगर, पिपरी व कांद्री परिसरातील दाट लोकवस्तीत पडुन मोठया प्रमाणात माती व कोळसा धुळीचे प्रदुर्शन होत नागरिकां च्या घरात, महामार्गावर, दुकानात माती धुळीचे थर बसत असल्याने नागरिकांना वारंवार साफ -सफाई नित्याची झाली आहे.






