खेळ मैदानात वेकोलि प्रशासनाने केली कोळसा मिश्रित माती डम्पिंग
खेळाचे मैदान उध्वस्त करित असल्याने खेडाळु व नागरिक संतप्त

कन्हान,ता.२० मे
वेकोलि कामठी व गोंडेगाव प्रशासना व्दारे गोंडेगाव वस्ती व कामगार वसाहती च्या मध्ये असलेले वेकोलि गोंडेगाव खेळाच्या मैदानात मध्यरात्री कोळसा मिश्रित माती डम्पिंग केले. संतप्त परिसरातील नागरिकांनी राष्ट्रीय कोयला खदान मजदुर संघ (इंटक) नागपुर क्षेत्र अध्यक्ष नरेश बर्वे यांच्या नेतुत्वात माती डम्पिंग अडवित आंदोलन करून मैदानात डम्पिंग केलेली माती जो पर्यंत हटवुन खेळाचे मैदान सुरक्षित करित नाही तो पर्यंत आंदोलन करण्याचा मानस व्यक्त केला.

कन्हान, खदान परिसरात कुठेही खेळाचे मैदान नसुन वेकोलि कामठी कॉलरी येथील ब्लँक डॉयमंड स्टेडियम हे कामठी खुली कोळसाकरिता उध्वस्त केले . तर गोंडेगाव वस्ती व खदान वसाहतीच्या मध्ये असलेले एकमेव खेळाचे मैदान असुन येथे कामगार, त्यांचे पाल्य व गोंडेगाव वस्ती सह परिसरातील खेडाळु खेळतात. परंतु वेकोलि प्रशासनाने या मैदानात कोळसा मिश्रित मातीची डम्पींग करण्याचे ठरविल्याने इंटक कामगार संघटन व स्थानिय नागरिकांनी पत्र, निवेदन देऊन या अगोदरच्या माती डम्पिंगमुळे परिसरात धुळ व वायु प्रदुर्षण मोठ्या प्रमाणात असुन नागरिकांच्या आरोग्यास हानिकारक ठरत आहे. खेळाचे मैदान उध्वस्त करून डम्पिंग केल्याने मोठया प्रमाणात प्रदुर्षण होईल. यास्तव खेळाच्या मैदानावर माती डम्पिग करू नये. प्रबंधकांनी यावर चर्चा करून मार्ग काढु असे आस्वस्त केले, तरी सुध्दा वेकोलिने मध्य रात्री मैदानात कोळसा मिश्रित माती डम्पिंग सुरू केल्याने राष्ट्रीय कोयला खदान मजदुर संघ (इंटक) नागपुर क्षेत्र अध्यक्ष नरेश बर्वे यांना सकाळी बोलावुन नागरिकांनी आंदोलन करून माती डम्पिंग अडवुन धरली.






