शाहु महाराजांच्या जयंती निमीत्त कौशल्य विकास प्रशिक्षण

कन्हान,ता.२७ जून
नगर परिषद कार्यालय मार्फत कौशल विकास केंद्र येथे डीजीटल कौशल विकास प्रशिक्षण सोमवार (ता.२६) जून रोजी समाजभवन, सार्वजनिक वाचनालय, हनुमान नगर, कन्हान येथे आयोजित करण्यात आले होते.

‘ई’ लायब्ररीच्या इमारतीत कौशल्य विकास प्रशिक्षणाचा कार्यक्रम घेण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षा कन्हान-पिपरी नगराध्यक्षा सौ.करुणाताई आष्टणकर तर प्रमुख पाहुणे प्रकाश नाईक, वसंत इंगोले उपस्थित होते. प्रसंगी राजर्षी शाहु महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार माल्यार्पण करुण अभिवादन करण्यात आले.





