Home नागपुर कन्हान शहरात बकरी ईद निमित्त राष्ट्रीय एकात्मता संदेश 

कन्हान शहरात बकरी ईद निमित्त राष्ट्रीय एकात्मता संदेश 

12

कन्हान शहरात बकरी ईद निमित्त राष्ट्रीय एकात्मता संदेश

कन्हान,ता.२९ जुन

    पटेल नगर, कन्हान येथील सुन्नी रज्जा मस्जिद मध्ये मुस्लिम बांधवानी बकरी ईद उत्साहाने साजरी करण्यात आली .

          गुरूवार (दि.२९) जुन ला मुस्लिम समाज बांधवानी बकरी ईद हा मोठा सण म्हणुन साजरा केला जातो. पटेल नगर, कन्हान येथील सुन्नी रज्जा मस्जिद येथे सकाळी मुस्लिम बांधवांनी नमाज पठण केले. यावेळी राष्ट्रीय एकात्मता, जातीय सलोखा, शांतता नांदावी यासाठी विशेष दुआ मागण्यात आली. त्यानंतर सर्वांनी एकमेकांना गळा भेट करुन ईद च्या शुभेच्छा दिल्या त्यानंतर मित्रासह आणि कुटुंबासह ईद मोठ्या उत्साहाने थाटात साजरी करण्यात आली. प्रसंगी इमाम हिदायत रजा, शेख अकरम कुरेशी, अब्दुल लतीफ़ शेख़, मोह शफीक शेख, फिरोज मोहम्मद, फैयाज खान, शेख ज़ाकिर हुसैन, शाहनवाज़ शेख़, शादाब कुरेशी, नफीस खान, सोहैल ख़ान, इसराइल ख़ान, अनीश खान पठान, शाहिद खान, गौश मोहम्मद, आकिब सिद्धिकी, अल्फ़ाज़ शेख, अनस शेख, अर्शीद शेख, साहिल खान आदि सह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.