श्री विठ्ठमाऊलीच्या दर्शनासाठी पदयात्रा दिंडी सोहळा

कन्हान,ता.४ जूलै
श्री संत शिरोमणी, श्री संत गजानन महाराज यांना श्री संत कोलवास्वामी यांच्या भेटी करीता व जगतपिता श्री विठ्ठमाऊली यांच्या दर्शनासाठी एक दिवसीय पदयात्रा सोहळा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

श्री संत गजानन महाराज मंदिर, गजानन नगर, कांद्री ग्रामवांसी द्वारे मंगळवार (दि.४) जुलै रोजी सकाळी ५ वा. श्री संत गजानन महाराज मंदिरात “श्री” चे मंगल स्नान करुन विधिवत पूजा अर्चना व भव्य महाआरती करण्यात आली.

श्री संत गजानन महाराज मंदिर येथुन भजन कीर्तनात मंत्रमुग्ध होऊन कांद्री ते श्री क्षेत्र धापेवाडा पर्यंत दिंडी सह पदयात्रा वारी काढण्यात आली. पदयात्रा राष्ट्रीय महामार्गावरील संताजी नगर हनुमान मंदिर होऊन चक्रधर पेट्रोल पंप जवळ पदयात्रेचे सांगता करण्यात आले. प्रसंगी उमेश कुंभलकर व मनोज काकडे मित्र परिवार द्वारे पालखी पदयात्रेत फुलाच्या वर्षावाने, बिस्कीट, अल्पोहार व चाय वितरण करुन स्वागत केले. पालखी पदयात्रेत दांडपट्टा, निमखेडा च्या खेळाडुंनी आपले कौशल्य दाखवून कराटे, कला, नृत्य सादर केले.






