Home नागपुर दत्त मंदिर कांद्री येथे गुरु पौर्णिमा उत्साहात थाटात साजरा

दत्त मंदिर कांद्री येथे गुरु पौर्णिमा उत्साहात थाटात साजरा

11

दत्त मंदिर कांद्री येथे गुरु पौर्णिमा उत्साहात थाटात साजरा

कन्हान,ता.४ जूलै

    कांद्री वार्ड, क्रमांक दोन येथील श्री दत्त मंदीरात विधिवत पूजा अर्चना करुन विविध कार्यक्रमाने गुरु पौर्णिमा मोठ्या उत्साहात थाटात पार पडला.

   सोमवार (दि.३) जुलै ला गुरु पौर्णिमा निमित्य कांद्री वार्ड, क्रमांक दोन येथील श्री दत्त मंदीरात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. सकाळी महिलांनी मंदिरात श्री दत्त मुर्तीचे दही, दुधाने जल अभिषेक आणि पुजा अर्चना करुन कार्यक्रमाची सुरूवात केली.

     यानंतर परिसरातील नागरिकांनी मंदिरात विधिवत पूजा अर्चना केली. दुपारला मंदिरात भजन मंडळ कांद्री येथील महिलांनी भजन ,  कीर्तन केल्यानंतर नागरिकांनी कवडुजी आकरे यांचा हस्ते दहीकाला कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमाच्या शेवटी परिसरातील नागरिकांना गुरु पौर्णिमेला प्रसादाचा आस्वाद घेतला.

    प्रसंगी महेंद्र पलिर, झिबल सरोदे, कवडु बारई, वामन देशमुख, चंद्रशेखर बावनकुळे, नथ्थुजी वझे, सौ.शोभा वझे, लता बावनकुळे, सुषमा गायकवाड, आशा हटवार, हिराबाई वंजारी, मंगला कामडे, सुनिता हिवरकर सह आदि नागरिक मोठ्या संख्येत उपस्थित होते.