भारतीय टेनी-कोइट संघात संजय चेटूले यांची निवड

नागपूर,ता.७ जूलै
भारतीय टेनी-कोइट संघात, वैनगंगा स्पोर्टिंग भंडारा येथील खेळाडू संजय माधव चेटुले व नंदिनी प्रभू फेंडर यांची निवड झाली.
दक्षिण आफ्रिका येथे होणाऱ्या वर्ल्ड कप टेनी-कोइट चॅम्पियनशिप मध्ये होणाऱ्या (दि.३०) सप्टेंबर ते (दि.८) ऑक्टोंबर २०२३ रोजी यात सहभागी होणाऱ्या भारतीय संघात, भंडारा येथील वैनगंगा स्पोर्टिंग चे खेळाडू संजय माधव चेटुले व नंदिनी प्रभू फेंडर यांची चेन्नई येथे झालेल्या इंडिया टीम सिलेक्शन कॅम्प मधून निवड झाली आहे.





