Home Breaking News कुहीत गुरूपुजन व विदर्भस्तरीय शाहीर संमेलन

कुहीत गुरूपुजन व विदर्भस्तरीय शाहीर संमेलन

11

कुहीत गुरूपुजन व विदर्भस्तरीय शाहीर संमेलन

नागपूर,ता.८ जूलै

       भारत सरकार सांस्कृतिक मंत्रालय, नवी दिल्ली व ओरेंज सिटी बहुउद्देशीय संस्था विहीरगाव यांच्या संयुक्त विद्यमानाने कुही येथे रविवार (दि.९) जुलै रोजी येथे गुरुपूजन व शाहीर संमेलन आयोजित करण्यात आला आहे.

        दरवर्षीप्रमाणे यंदाही (दि.९) जुलै रोजी वस्ताद पुंडलिक शेंडे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ हा सोहळा आयोजित केला आहे. कार्यक्रमाचे उद्घाटन आमदार राजू पारवे यांचे हस्ते करण्यात येईल. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खासदार कृपाल तुमाने तर प्रमुख पाहुणे म्हणून सामाजिक कार्यकर्ते प्रमोद घरडे प्रामुख्याने उपस्थित राहणार आहे. या कार्यक्रमात विदर्भातील सर्व शाहीर व कलाकार मंडळींनी उपस्थित राहावे असे आवाहन आयोजक कालीचारन शेंडे यांच्यासह ओरेंज सिटी बहुउद्देशीय संस्थेच्या अध्यक्षा नलू शेंडे यांनी केले आहे.