खंडाळा येथे गुरुपुजा व शाहीर कलाकार मेळावा
कन्हान,ता. १२ जुलै
कन्हान शहर परिसरातील खंडाळा येथे दरवर्षी प्रमाणे यावर्षी देखील (दि.९) जुलै रोजी गुरुपूजा व शाहीर कलाकार मेळावा कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला.

गुरुपुजेला कार्यक्रमाचे उद्घाटन व दिप प्रज्वलन माजी आमदार राजेंद्र मुळक यांचे हस्ते करण्यात आले. युवा शाहीर सुरज नवघरे यांच्या विनंतीला मान देऊन गरजू विकलांग मुलगी मनसा मंगेश पाटील हिला या प्रसंगी व्हील चेअर देण्यात आली. यावेळी नवघरे यांनी राजेंद्र मुळक यांच्या समोर शाहीरांना मानधन समिती मध्ये योग्य आणि कलाकार व्यक्तीची निवड करण्यासाठी विनंती केल्याने त्यांनी अनुभवी आणि कलाकारांना न्याय मिळवून देईन अशांची मानधन समिती नियुक्ती करण्याचे आश्वासन दिले.





