*मोकाट जनावरांच्या उपाययोजनेसाठी निवेदन*
सावनेर : वर्षभर विशेषकरून पावसाळ्यात मोकाट गायी, सांड, कुत्रे इत्यादी शहरातील रस्त्यांवर कधी ठाण मांडून बसतात तर कधी यांचा मुक्त वावर असतो. याचा नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतो. बहुतेक वेळा या जनावरांना थेट धडक बसते किंवा बावरलेले जनावर हल्ला करतात, त्यांच्या शेणावरून घसरणे वगैरे यात अपघात होऊन आतापर्यंत अनेक नागरिक, विद्यार्थी जखमी झालेले आहेत. जनावरे सुद्धा जखमी होतात. खासकरून नागमंदिर ते शिवमंदिर दरम्यान रहदारीचा कोंडमारा होतो. अनेक लोकांच्या या बाबतीत तक्रारी आहेत.





